in

जळगाव जिल्हयात पावसाची दमदार सुरुवात

मंगेश जोशी | जळगाव | राज्यातील काही भागात 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, सलग्न मराठवाडा भाग आणी उत्तर मध्य महाराष्ट्र काही भागात पाऊस राहील असे सांगण्यात आले आहे. जळगाव जिल्हयात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे.

दरम्यान रावेर तालुक्यातील सावदा,अहिरवाडी, खिर्डी बुद्रुक, विटवा, ऐनपूर तर यावल तालुक्यातील फैजपुर व परिसरातील गावांमध्ये अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुने यांनी घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार; भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

लसीकरणासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा : पालकमंत्री शिंदे