in

राज्यात सलग 3 दिवस जोरदार पाऊस

परतीच्या पावसाने पुन्हा जोम धरायला सुरवात केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यभर पावसाला सुरूवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम मुंबई, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि राज्याच्या अनेक भागात दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यभर पावसाची शक्यता कुलाबातील प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, नंदूरबार, धुळे आणि जळगाव या भागात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाशिम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होताना दिसत आहे.

दरम्यान, मराठवाड्यात अनेक पावसाने जोरदार हजेरी लावली असल्यामुळे मराठवाड्यातील धरणं 100 टक्के भरली आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजा सुखावला असल्याचं दिसून येतंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मांजरा धरण ‘ओव्हर फ्लो’, पाण्याचा विसर्ग सुरू

रविवारी मध्य रेल्वेचा 10 तास विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक