in

न्हावा शेवा बंदरातून सव्वाशे कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) कारवाईमध्ये कंटेनरमधून 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे सव्वाशे कोटी रुपये आहे. हा कंटेनर नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पकडला गेला. या प्रकरणी जयेश संघवी नावाच्या व्यावसायिकालाही अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील एक 62 वर्षीय व्यापारी कथितपणे 25 किलो हेरॉईनची तस्करी इराणमधून शेंगदाणा तेलाच्या आडून करत होता. DRI च्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईच्या न्हावा शेवा येथे इराणहून आलेला एक कंटेनर ताब्यात घेतला आणि 4 ऑक्टोबर रोजी त्याची तपासणी केली.

या वर्षी जानेवारीपासून मुंबई पोलिसांनी 3,333 अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे नोंदवले आहेत तर सुमारे 3,575 लोकांना अटक केली आहे आणि 86.50 कोटी रुपये किंमतीची 3,813 किलो विविध प्रतिबंधित ड्रग्ज जप्त केले आहेत. ANC ने यापैकी 88 प्रकरणे नोंदवली. या प्रकरणांमध्ये 129 लोकांना अटक करण्यात आली आणि 60.16 कोटी रुपये किमतीचे 2,569 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गुगल करणार ‘हा’ मोठा बदल

आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू