राज्यातील कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणावर वाढताना दिसत आहे. दररोज कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत नवे कोरोनाबाधित हे अधिकच आढळून येत आहेत.त्यात आज तब्बल 70 दिवसानंतर आज सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली असून राज्यावर लॉकडाऊनचे संकट घोघावू लागले आहे.
आज राज्यात 4 हजार 787 नवे करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 20 लाख 76 हजार 093 वर पोहचली आहे. सध्या 38 हजार 013 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.तर आज 3, हजार 853 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यत एकूण 19 लाख 85 हजार 261 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याचबरोबर दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 51 हजार 631 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान लॉकडाऊनची गरज नसल्याचे सत्ताधारी बोलत आहेत. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला करत आहे. मात्र वाढती कोरोनाची आकडेवारी पाहता राज्यात लॉकडाऊनची टांगती तलवार आहे.
Comments
Loading…