in

हिमा दासची आसामच्या पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. आपले बालपणीचे स्वप्न साकार होत असल्याचे या प्रसंगी हिमाने सांगितले.

माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा दासला नियुक्ती पत्र दिले. राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिस महासंचालकांसह, पोलिस विभागातील इतर अधिकारीही समारंभाला उपस्थित होते.

डीएसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर झालेल्या समारंभाला संबोधित करताना २१ वर्षीय हिमाने सांगितले की, तिने लहान असताना पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.

बच्चू कडू यांनी देखील “अभिनंदन हिमा दास! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जलद धावपटू बनलेली भारत देशाची शान ‘हिमा दास’ ला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.” असे म्हणत ट्विट केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Oscar शर्यतीत आणखी एका भारतीय चित्रपटाची एण्ट्री

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! आज मराठी भाषा दिन