in

मोदींनी दिलेली माहिती ऐकून त्यांचे भक्त थरारून गेले असतील – शिवसेना

सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर उपरोधिक टीका केली आहे. ‘मोदींनी दिलेली ही माहिती ऐकून त्यांचे भक्त नक्कीच थरारून गेले असतील. इंदिरा गांधींनी युद्ध करून पाकिस्तान तोडले व बांगलादेश निर्माण केला, यापेक्षा बांगलादेश निर्मितीसाठी मोदी यांनी सत्याग्रह केला हे शौर्य भाजप कार्यकर्त्यांना वाटू शकते,’ असा टोलाही शिवसेनेनं दिला आहे.

मोदींनी नुकताच बांगलादेश दौऱ्यात त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामाची आठवण काढली. स्वातंत्र्य लढ्यातील स्वत:च्या सहभागाचाही उल्लेख केला. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. ‘इंदिरा गांधींच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारून पाकिस्तानची सरळ फाळणीच केली. त्यानंतर असं शौर्य कोणत्याही पंतप्रधानांना गाजवता आलं नाही. त्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात आपलाही सहभाग होता, असं विधान मोदी यांनी बांगलादेशच्या भूमीवर जाऊन केलं, हे आश्चर्यच आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘मोदी सांगतात ते खरेच मानायला हवे, अशी आजची स्थिती आहे. पण पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी इतका खटाटोप करावा लागेल व प्रकरण बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागापर्यंत पोहोचेल असे वाटले नव्हते,’ असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

corona vaccination |महानगरपालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

IPL 2021 | रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल