in

Holi 2021 | देशात रंगपंचमीचा उत्साह, महाराष्ट्रात रंगाच्या सणावर निर्बंध

देशभरात आज रंगाचा उत्सह, म्हणजे होळी, धुळवड साजरा केला जात आहे. रविवारी होळी दहनाने या उत्सवाचा जल्लोष सुरू झाला. आज धुळवड, रंगपंचमीचा साजरी केली जात आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने होळी आणि धुलीवंदनाच्या सणावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी किमान घरात जोरदार सेलिब्रेशन करायचे ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची रंगपंचमीचा सावधानतेने खेळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तर काही राज्यात राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळी, धुलिवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणच्या प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात आली आहे. तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्राच्या दिल्ली विधेयकाचं कायद्यात रुपांतर; नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ

सचिन – युसूफनंतर आता ‘या’ क्रिकेटपटूला कोरोनाची लागण