“होळी रे होळी शिमग्याची पोळी” ऐकले की आठवण होते ती तळकोकणातील शिगमोत्सवाची
होळी म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन किंवा धूळवड खेळली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळी, धुलिवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत ठिकठिकाणच्या प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
तळकोकणात शिमगोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या रूग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गावहोळ्या ,देव होळ्या, राखणेच्या होळ्या उभ्या करते वेळी ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने आदेश दिले आहेत. धार्मिक कार्यक्रमांना देखील बंदी घालण्यात आलेली आहे.
शिमगोत्सवामध्ये शबय मागणे, गावात खेळ,रोंबाट मारने किंवा लोककलेचे कार्यक्रम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आली असून या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धुलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेतंर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Comments
Loading…