in

म्हाडाकडून टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 फ्लॅट्स, रुग्णांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी निर्णय

टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स देण्यात येणार आहे. यामुळे कॅन्सरच्या उपाचारासाठी देशभरातून येणाऱ्यांच्या नातेवाइकांना याद्वारे आसरा उपलब्ध होईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली.

आम्ही मानवतेच्यादृष्टीने हा निर्णय घेतला आहे. करीरोड स्टेशनच्या बाजूला व टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर हाजीकासम चाळ येथे हे फ्लॅट आहेत. हे फ्लॅट्स टाटा कॅन्सर रुग्णालया सोपविण्यात येणार आहे. या फ्लॅट्सशी म्हाडाचा काहीही संबंध नसेल. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या पाच दिवसांमध्ये झाली. टाटा व म्हाडामध्ये तसा करार देखील झालेला आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वास्तूविशेष : पंचतत्व आणि वास्तूची रंगसंगती!

सावधान ! WhatsApp वर असा मेसेज आल्यास सतर्क राहा