in

गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश करणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, या प्रकरणात NIA ने वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली, या प्रकरणाचा धागेदोरे शोधण्यासाठी NIA तपास करत आहेत, यातच वाझेंचे निलंबन करत ठाकरे सरकारनं मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग (Param Bir Singh) यांचीही उचलबांगडी केली, सध्या राज्यात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे पत्र जास्तच व्हायरल झाले आहे.

याप्रकरणी, अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात येणार आहे. स्वत: अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करावी अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली असून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या आरोपाची चौकशी होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू असणारे नियम

गेट २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर