लोकशाही न्यूज नेटवर्क
जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर आता जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधयक मांडताना मागील सत्तर वर्षे काँग्रेसच्या सरकारने काय केलं, याचा हिशोब मागितला. तसेच सत्तर वर्षांत निर्णय घेण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसजनांना आम्हाला प्रश्न विचारण्याची लायकी नाही, असे शाह म्हणाले.
विधेयकावरील चर्चेवेळी विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून अमित शाह यांनी पलटवार करत जम्मू काश्मिरला योग्य वेळी राज्याचा दर्जा दिला जाईल, अशी ग्वाही अमित शाह यांनी दिली. आज लोकसभेत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.
आधी इथे फक्त तीन घराणी राज्य करत होती. आता सर्वसामान्य लोक सत्ता सांभाळतील आणि योग्य वेळ येताच जम्मू काश्मिरला संपूर्ण राज्याचा दर्जा प्रदान केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिली.
ओवैसी यांनी अधिकाऱ्यांच्या केडचे हिंदू-मुस्लीम असे विभाजन केले. त्यांच्या मनात सर्व गोष्टी हिंदू-मुस्लीम अशाच आहेत. देशाचे अधिकारी धर्मांमध्ये वाटून स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणता, असा प्रश्न गृहमंत्र्यांनी उपस्थित केला. शाळा जाळल्या नसत्या, मुलांना मदरस्यांमध्ये जाण्याची सक्ती केली नसती, तर आज काश्मीरची मुलं देखील आएएस- आयपीएस झाली असती, असे शाह म्हणाले.
Comments
Loading…