in

29 मार्च ते 4 एप्रिल 2021

साप्ताहिक राशीभविष्यामध्ये सर्व वाचकांना होळीच्या शुभेच्छा!!!

सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण कन्या राशीत हस्ता नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात असून शेवटी धनू राशीच्या पूर्वाषाढ़ा नक्षत्राच्या चौथ्या चरणात असेल.
मंगळ राहुचा अंगारक योग, मध्यंतरात चंद्राचे वृश्चिक राशीत भ्रमण, चंद्रग्रहण योग घडवेल. 29 मार्च रोजी, सोमवारी होळीची “कर” असल्यामुळे तसेच सप्ताहात भद्रा, रिक्ता आणि गंडमूल असल्यामुळे शक्यतो शुभकार्य, नवीन उपक्रम टाळावेत. एक एप्रिलला होणारे बुध ग्रहाचे मीन राशीत राश्यांतर आणि साप्ताहिक राशीभविष्य आज आपण पाहू..

मेष :
सप्ताहाच्या सुरुवातीला नैराश्य देणारी मानसिकता आव्हानात्मक असू शकते. मनाचा एकटेपणा, स्वस्थ्य तक्रारी भासवतील.
नोकरीच्या ठिकाणी स्पष्ट वक्तव्य गरजेच. गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करून तज्ञ लोकांचे मत जरूर घेणे. प्रतिस्पर्धी वरचढ़ ठरतील. मित्रांची खरी मैत्री ऐन वेळेला फायदेशीर. व्यावहारिक आर्थिक निर्णय जोखमीचे ठरू शकतील. जोड़ीदाराबरोबर त्रयस्थ व्यक्तीचा मध्यस्थ टाळा. प्रेमप्रकरणात आव्हानात्मक निर्णय घेऊ नका.

उपाय – श्री मारुती स्तोत्र पठण.

वृषभ :
येणारा सप्ताह मिश्रफलित असून, मनावरचे संतुलन बिघडून आक्रमकता टाळा. कामाचे चोख नियोजन बिघडवून न देता व्यय टाळा. ज्येष्ठ व्यक्तींकडून विश्वासर्ह पाळा. सरकारी कामकाजात यशप्राप्ती मिळून नवीन नोकरीचे योग घडतील. गुप्तआर्थिक स्रोत प्राप्त, कर्ज परतफेड शक्य. कामवरचा ताणतणाव घरातील शांतता बिघडावेल. प्रेमप्रकरणात यश मात्र संसारात स्वस्थ्य तक्रारी संभवतील.

उपाय – घरातील पहिल्या पोळीचा गायीला घास दया.

मिथुन :
सप्ताह मिश्रफलित असून, मनाचा संभ्रम ठरवलेल्या कार्याचा ढाचा बघडवू शकेल. उद्योगधंद्यात चढ़उतार, मनाची एकाग्रता बिघडल्यामुळे कामाच्या ठिकाणी, करिअरसंबंधी गोंधळ होऊ शकतो. उद्योगधंद्यात आर्थिक गुंतवणूक करताना सतर्कता गरजेची. परदेशात गुंतवणूक प्रमुख्यान टाळा. कामाच्या ठिकाणी लक्षविचलितपणा कलहाच ठरू शकेल. कौटुंबिक परिस्थिती आनंददायक. नविन दाम्पत्यास प्रणयकारक तसेच गर्भधारणेसाठी उपयुक्त काळ.

उपाय – शिवलिंगावर जल अभिषेक, विष्णुसहत्रनाम पठण.

कर्क :
आत्मविश्वास आणि एकाग्रता वृद्धी करून, ध्येय प्राप्तीसाठी योग्य कालावधी. जवळच्या मित्रावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास हानिकारक. गुंतवणूक करताना ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ गरजेची. वरिष्ठांकडून नोकरीच्या ठिकाणी बक्षिसपात्र कौतुक. आत्मपरीक्षण गरजेच. कौटुंबिक जीवनात आनंद, मानसिक शांतता लाभेल. प्रेमप्रकरणात नविन खुलासे आश्चर्यकायक.

उपाय – श्रीसुक्तपाठ 16 वेळा.

सिंह :
अथक परिश्रमाचे योग्य फल देणारा सप्ताह. कार्यकुशलता, नैपुण्य यांचे योग्य श्रेय सप्ताहाच्या सुरुवातीला मिळेल. नवीन नोकरीचे बढतीचे तसेच बदलीचे योग. उद्योगाच्या ठिकाणी बदलेले कामाचे स्वरुप नकारात्मक वातावरण ठरू शकेल. त्यामुळे आर्थिक हानी किंवा आक्रमकता दिसेल. गुंतवणूक करताना तज्ञांचे मत आवश्यक. बचतीवर परिणाम, कर्जफेडिला आव्हान पण वडिलांकडून आर्थिक सहयोग. सुखस्वास्थ्य लाभून प्रेमप्रकरणात जोडीदार साथ देईल.

उपाय – सूर्याला अर्घ्य देणे.

कन्या :
सप्ताह सुरुवात अतिशय प्रफुल्लित. परंतु विनाकारण नकारात्मक लहरी मानसिक, शारीरिक सामर्थ्य बिघडवू शकतील. नियमितता सुनियोजित केली असता अंतिम ध्येयप्राप्ति शक्य. उधारी देण आणि घेण टाळा. आईच्या तब्बेतीची काळजी आवश्यक. नविन नोकरीच्या संधी उपलब्ध. खुलीचर्चा कौटुम्बिक वातावरण प्रसन्न ठेवेल.

उपाय – हनुमान चालीसा पठण.

तूळ :
मिश्रफलित सप्ताह. आत्मविश्वास मानसिक, शारीरिक अस्वस्थता दूर ठेवेल. कार्यकुशलतेच कौतुक प्रेरणात्मक ठरेल. उद्योगधंद्यात सकारात्मक वातावरण, कुठलाही निर्णय घाईगडबडीत टाळा. आईवडिलांच्या स्वास्थाकडे विशेष लक्ष आवश्यक. तब्येतीची काळजी घेऊन घरगुती खाण्यावर विशेष भर द्यावा. प्रेमप्रकरणत वाद टाळा.

उपाय – श्रीकृष्णाला बेसन लाडवाचा नैवेद्य दया.

वृश्चिक :
मनाची एकाग्रता ढसाळ झाल्यामुळे नकारात्मक विचार वादविवादित ठरतील. स्वतःच मूल्यमापन आणि आत्मपरीक्षण आवश्यक. विचार आणि आचार यामध्ये तफावत असल्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. प्रवास फायद्याचे ठरतील. व्हिसलिस्ट वाढतील पण कर्ज वाढतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य तक्रारी वाढून मानसिक तणाव कौटुंबिक वादास कारणीभूत. नवीन लग्नाच्या बोलणी होतील. प्रेमप्रकरणात रोमँटिक स्थळी छान प्रवास योग सुखकारक ठरतील.

उपाय – मंगळवारि मारुतीला शेंदूर लेप आणि चमेलिच तेल वहा.

धनू :
आव्हानात्मक सप्ताह, कामाच्या ठिकाणी आणि स्वतःच्या आत्मपरीक्षणाची गरज. विचारहीन निर्णय हानिककारक. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मानसन्मान मिळेल. नवीन वास्तुच्या सकारात्मक लहरी नवी उमेद निर्माण करतील. लॉंग टर्म म्यूच्यूअल फंड गुंतवणूक फायद्याची ठरेल. घाईगडबडीत स्वतःकडे दुर्लक्ष नको. पोटाची काळजी घ्या, घराचा सकस आहार घ्या. जोडीदाराबरोबर सौख्याचे संबंध प्रस्थापित. प्रेमप्रकरण मार्गी लागतील.

उपाय – माथ्यावर केशर तिलक आणि गणेशाला तुपाचा दिवा लावा.

मकर :
भ्रमात राहू नका, चुकीची छाप मानसिक तणाव निर्माण करेल. संशयी प्रवृत्ती वैयक्तित आणि व्यावहारिक आयुष्यात अडचणी निर्माण करेल. खूप प्रयत्न करूनही पाहिजे तस यश मिळण्यास विलंब. छोटीशी चूक मोठी समस्या बनू शकते. मात्र, शेवट चांगला होईल. स्री चा आदर लक्ष्मीप्राप्ति करून देईल. निर्णय दिरंगाई उद्योगधंद्यात तोटा देईल. प्राणायाम, योगविद्या मनाची एकाग्रता वृद्धि वाढवेल. संशयी प्रवृत्ती जोडीदार किंवा प्रेमप्रकरणात दुरावा आणेल.

उपाय – मंगळवारी आणि शनिवारी न चुकता पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा.

कुंभ :
वेळेचं, कामाचं योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम तुमचे लक्ष्य गाठण्यास उपयुक्त. प्रवासावर नियंत्रण ठेवून, काहीही करण्यापूर्वी पडताळा करून निर्णय घ्या. स्वतः ला कामात सतत व्यस्त ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवून विचारपूर्वक निर्णय ध्येय प्राप्ती करतील. आर्थिक गुंतवणूक टाळा. नवीन उपक्रम फायद्याचे. नवीन नोकरीत यश, नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. आक्रामकता टाळा.

उपाय – शिवलिंगावर जलाभिषेक करावा.

मीन :
भौतिक सुखांची रेलचेल कामाच्या ठिकाणी योग्य निर्णयक्षमता मार्गी लागेल. समाजात मानसन्मान, नवीन उपक्रम सप्ताहाच्या सुरवातीलाच प्रफुल्लता देतील. नवीन गुंतवणूक फायदेशीर, शुभकार्य घबाड देतील. मनाजोगी नोकरी तसेच उद्योगात नवीन परचेस ऑर्डर्स मिळतील. तपास कार्यात विशेष गती प्राप्त. जोडीदाराबरोबर मानसिक दुरावा त्रासदायक ठरेल. विनम्रता गुरुकिल्ली ठरेल. तज्ञांचे मत उपयुक्त.

उपाय – गरीब व्यक्तीस अन्न आणि कपडे दान करा.
जमल्यास म्हाताऱ्या स्री ला रसगुल्ले सूर्यास्तानंतर दान करा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rafale | भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; 10 राफेल विमानं येणार ताफ्यात

पुण्यात अवैध वाळू उपसा बोटींवर कारवाई , 60 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट