in

कशी आहे? भारतीय नौदलाची भेदक आणि अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली!

‘विशाखापट्टणम’ म्हणजे भारतीय नौदलाचा नवा चेहरा. युद्धनौका आणि पाणबुड्यांसाठी भेदक ठरणारी अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली. विशाखापट्टणम हा प्रोजेक्ट १५ ब्राव्होमधील पहिलीच गायडेड मिसाइल विनाशिका त्यामुळे बहुपयोगी युद्धयंत्रणाच ठरली आहे.

रविवारी ही युद्धयंत्रणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह त्यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे. या माध्यमातून नौदलाने ७५ टक्क्यांहून अधिक स्वयंपूर्णता प्राप्त केली आहे. या नव्या अद्ययावत विनाशिकेची धुरा कॅप्टन बीरेंद्र बैन्स यांच्या हाती असेल.

विनाशिकेच्या तळासाठी वापरलेले स्टील पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून ते वजनाला तुलनेने हलके आहे. त्यामुळे विनाशिकेचा आकार अधिक लांबीचा असूनही वजन काही अंशी कमी करण्यात यश आले आहे. वजन कमी असल्याने कमीतकमी इंधन वापर करून अधिक पल्ला गाठणे शक्य होणार आहे. ‘विशाखापट्टणम’ ही आजवरची सर्वाधिक लांबीची अशी विनाशिका आहे.

या विनाशिकेच्या मध्यवर्ती भागात पाणतीर युद्धनौकांसाठी खास सोय करण्यात आली आहे. भूपृष्ठावर स्वनातित वेगात मारा करणारी ‘ब्राह्मोस क्षेपणास्त्रे’ यावर तैनात आहेत. विनाशिकेचे वैशिष्ट्य परिसर वेगात स्कॅन करणारे सरफेस सर्व्हिलन्स रडार असलेली ही पहिलीच युद्धनौका आहे. त्यामुळे आजूबाजूचा काहीशे किलोमीटर्सचा परिसर विनाशिकेच्या टापूत आला आहे. नव्या अतिअद्ययावत युद्धप्रणालीमुळे पूर्वी संदेशवहनानंतर शस्त्रास्त्रांचा मारा करण्यास लागणारा वेळ आता कमी झाला आहे. युद्धसदृश परिस्थितीत वेगात काम करण्यात ही विनाशिका सर्वात अग्रणी असेल.

यामध्ये शत्रूच्या यंत्रणेला ब्लॉक करण्याची त्याचप्रमाणे त्याची दिशाभूल करण्याचीही क्षमता आहे. याशिवाय यावर ‘बराक’ ही हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा असून ‘शक्ती’ ही नव्याने विकसित केलेली ‘इलेक्ट्रॉनिक टेहळणी’ यंत्रणाही कार्यरत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST Worker Strike | 2 हजार 776 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी