in

कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची?

केंद्र सरकारने बुधवारी लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याची घोषणा केली. त्यानुसार ६० वर्षे वयावरील लोकांना १ मार्चपासून लस घेता येईल, तर ४५ वर्षे वयावरील परंतु ज्यांना शारीरिक व्याधी असतील अशांनाही लस घेता येणार आहे.

लसीकरणासाठी ३० हजार केंद्रांची उभारणी केली जाणार असून त्यापैकी १० हजार केंद्रांत लस मोफत दिली जाणार आहे. खासगी आरोग्य केंद्रे व रुग्णालयांत लसीसीठी शुल्क आकारले जाणार आहे. परंतु लसीकरणासाठी नोंदणी कशी आणि कुठे करायची, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वनोंदणी पद्धत असेल. लाभार्थ्याला को-विन ॲप २.० डाऊनलोड करावे लागेल. या ॲपवरून लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकेल.

आधार कार्ड,मतदार ओळखपत्र, वयाची खात्री झाली की मगच को-विन ॲपवर अन्य माहिती दिसू शकेल.
त्यात वय ५०पेक्षा कमी असल्याचे दर्शवत असेल तर काय करावे? यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. मतदारयादीतील तुमच्या नोंदणीनुसार तुमच्या वयाची पडताळणी केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर वय अपडेट केले जाईल.

को-विन ॲपवर तुम्ही अपलोड केलेला डेटा आणि वय हे सर्व जुळले की ॲपवर लसीकरण केंद्राची नावे आणि स्थळ पाहायला मिळेल. आपण कोणत्या स्थळी लस घ्यावी याची निवड लाभार्थ्याला करता येईल.कोणत्या तारखेला लस घ्यायची हे ठरविण्याचे अधिकारही लाभार्थ्याला असतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माणगाव शहरातील स्वस्तिक कॉम्प्लेक्स मधील दुकानाला भीषण आग

राज्यभर राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीचं चूल मांडो आंदोलन