in

जिममध्ये ह्रतिक रोशन खेळू लागला गरबा; व्हिडीओ झाला व्हायरल

बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशनचा नुकताच त्याचा जिममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण ह्रतिकचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ जिममधील वर्कआउटचा नसून चक्क डान्सचा आहे.

ह्रतिक रोशनने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर जिममधील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तो म्हणाला, ‘जेव्हा एखादा बॉलिवूड हिरो जिममध्ये अचानक 80 च्या दशकातील गाणी ऐकतो’.

यातील पहिल्या व्हिडीओत ह्रतिक गरबा खेळताना दिसतोय. तर पुढे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील ‘जानू मेरी जान’ या गाण्यावर त्याने नाचायला सुरुवात केली. शेवटच्या व्हिडीओत तो मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘जिमी जिमी आजा आजा’ या गाण्यावर डान्स करत आहे. ह्रतिकच्या या व्हिडीओ प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

११ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त

Stock Market | सेन्सेक्स ६१,८१७ तर निफ्टी १८,५०० च्यावर झाला बंद