in

हृतिक रोशनच्या घटस्फोटीत पत्नीचा आज वाढदिवस

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान हिचा आज 43 वा वाढदिवस आहे. सुझानचे कुटुंब फिल्मी दुनियेशी संबंधित आहे.सुझान प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. तिचा भाऊ झायेद खान देखील अभिनेता आहे. तीच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चाह्त्यांनच्या चर्चेत असते सुझाननेअमेरिकेतून शिक्षण घेतले आहे. तिने 1996 मध्ये आपल्याला करिअरला सुरुवात केली. पण ती कधीही चित्रपटात दिसली नाही.

सुझान खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. सुझान सोशल मीडियावर खूप सक्रिय असून चांगली फॅन फॉलोइंग देखील आहे. सुझानची अनेक बॉलिवूड स्टार्सशी चांगली मैत्री आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या खास निमित्त जाणून घ्या तिच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्ट.

2000 मध्ये हृतिक आणि सुझानचे लग्न झाले. 4 वर्षांपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले होते
13 वर्षांनंतर म्हणजेच 2013 मध्ये हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला. घटस्फोटामुळे सुझान चर्चेत होती. हृतिक आणि सुझान यांना दोन मुले आहेत. घटस्फोटानंतरही सुझान हृतिकच्या घरी सतत येत असते.घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझानची मैत्री खूप चांगली असल्याचे दिसते.2011 मध्ये, सुझानने शाहरुखची पत्नी गौरी खानसोबत भारतातील पहिले इंटिरियर फॅशन डिझाईन स्टोअर सुरू केले. त्याचे नाव होते द चारकोल प्रोजेक्ट फाउंडेशन.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold-Silver Rate Today | आजचे सोन्याचांदीचे दर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक, दोघांना अटक करत पोलिस कोठडी