बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु तर्फे कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. येत्या शनिवारी ऋतिक रोशनला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. ऋतिक रोशनने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली आहे. ऋतिकच्या तक्रारी नुसार मुंबई क्राईम ब्रांच तपास करत आहे.
अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत हे चांगले मित्र होते. मात्र , नंतर त्यांच्यात वाद झाल्या नंतर कंगनाने ऋतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. यावेळी आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासा ऋतिकने केला होता.
कंगना रनौत आणि ऋतिक रोशन वाद
कंगना रनौत आणि ऋतिक रोशनचा वाद अनेकजण विसरले नसतील, हे प्रकरण किमान ऋतिक-कंगनाच्या चाहत्यांच्या तरी लक्षात असेलच तीन-चार वर्षांपूर्वी प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली आहे. केवळ बोललीच नाही तर ऋतिकबद्दल मनात असलेली सगळी भडास तिने बाहेर काढली होती. कंगनाने त्यावेळी अनेकदा ऋतिकवरील आरोपांच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. कंगनाने माध्यमासमोर ऋतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते.
Comments
Loading…