in

HSC Exams : यंदा बारावीचे सगळेच विद्यार्थी पास!

राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर यासंदर्भातली घोषणा केली आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातला शासन आदेश ट्विटर हँडलवरून ट्वीट केला आहे. “विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे”, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या जीआरमध्ये अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे. “बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत, तसेच गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश जारी करण्यात येतील”, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाशिममध्ये 35 खेडयाचा विद्युत पुरवठा खंडित;ग्रामस्थांनी महामार्गावर केला चक्काजाम

Maharashtra Corona : 11 हजार 766 नवे कोरोनाबाधित; रिकव्हरी रेट 95.4 टक्के