in

मी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार व्हायला तयार – मिथून चक्रवर्ती

काही दिवसांपूर्वीच अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी स्वतःला कोब्रा संबोधून त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आता मिथून चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे आता पक्षाने काय तो निर्णय घ्यावा असे मिथून यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनेच्या मते, मिथून म्हणाले की, भाजप मोठा पक्ष आहे, जर माझ्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईल. माझ्या पक्षात अनेक लोक मुख्यमंत्रीपदासाठी लायक आहेत. पण हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांचा आहे असेही मिथून म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी यांने जर आदेश दिले तर आपण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत. असे देखील ते यावेळी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG 3rd ODI; भारताला पाचवा झटका, ऋषभ पंत बाद

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण