in

‘मला माधुरी दीक्षित होण्याची महत्त्वाकांक्षा’

बंटी और बबली 2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्या शर्वरी वाघने आपल्या अभिनयाची चूनूक दाखवली आहे. एक मराठमोळी कलाकार असल्याने महाराष्ट्राचा मानबिंदू माधुरी दीक्षितच्या पावलावर पाऊल ठेवत मार्गक्रमणा करण्याची शर्वरीची महत्त्वाकांक्षा आहे. देशाची धकधक बनलेल्या माधुरीने तिच्या काळातील पुरुष सहकारांच्या खांद्याला खांदा लावून मोठे यश मिळवले होते.

“एक महाराष्ट्रीय असल्याने मी माधुरी दीक्षितला समोर ठेवत लहानाची मोठी झाले. आपल्या राज्यातील ही अभिनेत्री भारताची सुपरस्टार बनली आणि लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. माझ्यासारख्या महाराष्ट्रातील कलाकारांना माधुरी दीक्षित होण्याची महत्त्वाकांक्षा असून तिच्यासारखी लोकप्रियता मिळवायची आहे. तिच्यासारखी अदा अंगात मुरावी म्हणून मी प्रयत्नशील असल्याचे शर्वरीने सांगितले. माझे पदार्पण होण्यापूर्वी माधुरी माझ्याकरिता मोठा रेफरन्स पॉइंट होती. मी तिची अदाकारी पाहून नोट्स काढण्याचा प्रयत्न करते, असेही तिने यावेळी सांगितले.

बंटी और बबली 2 मधील अभिनयाबाबत ती म्हणते, “बंटी आणि बबली 2 मधील अभिनयासाठी लोकांनी ज्याप्रकारे माझे कौतुक केले, मला त्यांचा आदर वाटतो. या इंडस्ट्रीत माझ्यावर कोणाचाही वरदहस्त नसताना माझ्या वाटणीचा संघर्ष करावा लागला. ही पदार्पणाची फिल्म मिळण्यापूर्वी अनेकदा अपेक्षाभंग झाले आणि मी प्रत्येक क्षण भरभरून जगले. मी माझे हृदय आणि आत्मा या फिल्ममध्ये ओतला. चाहत्यांनी ज्याप्रकारे माझ्या अदाकारीचे कौतुक केले, स्वीकारले त्याविषयी आनंद वाटतो. माझ्यादृष्टीने ते फार महत्त्वाचे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs NZ 1st Test | भारत – न्यूझीलंड कसोटी सामना अखेर ड्रॉ

December Bank Holiday | डिसेंबरमध्ये 12 दिवस बँका बंद…पाहा संपूर्ण यादी