किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवजन्म सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या याबद्दल आता बोलत असताना अतुलजी मला सांगत होते. त्यात एक भाषा होती, इंगित विद्याशास्त्र. ही भाषा दादांना (अजित पवार) येते. पण, आता मी ती भाषा शिकणार आहे. का? तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या, गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन की, दादांच्या मनात काय चाललंय,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित कार्यक्रमात म्हणाले.
छत्रपतींना येणाऱ्या भाषांचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी नवीन भाषा शिकणार असल्याचं सांगताच हास्याचे कारंजे उडाले.
शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळा कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींना अवगत असलेल्या भाषांचाही भाषणात उल्लेख केला. “शिवयोग हा एक नवीन शब्द आहे. त्याचबरोबर शिवसुमन हे फुल. हे फुल आधी बघितलं नव्हतं अशातला भाग नाही. पण, त्याच वैशिष्ट्ये आज कळालं. ते फुल शिवनेरी परिसरातच पहिल्यांदा आढळून आलं, हा शिवयोग आहे. ज्यांनी ते शोधलं, त्याचं वेगळेपण ओळखलं त्यांचं मी कौतूक करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या याबद्दल आता बोलत असताना अतुलजी मला सांगत होते. त्यात एक भाषा होती, इंगित विद्याशास्त्र. ही भाषा दादांना (अजित पवार) येते. पण, आता मी ती भाषा शिकणार आहे. का? तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या, गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन की, दादांच्या मनात काय चाललंय,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना पोट धरून हसायला लावलं.
Comments
Loading…