in

आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीच्या परी‌क्षांचे वेळापत्रक जाहीर

राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्डानेही २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा ५ मे ते ७ जूनपर्यंत, तर बारावीची परीक्षा ८ एप्रिल ते १६ जूनपर्यंत होणार आहे.

आयसीएसई मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेचे वेळापत्रक आयसीएसईच्या www.cisce.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही परीक्षा घेताना कोरोनासंदर्भात केंद्रांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक केले आहे.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचता यावी यासाठी परीक्षेच्या १५ मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. मात्र परीक्षेला सुरुवात दिलेल्या वेळेतच होईल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याला कोरोना नियमांचे काटेकोरपणे पाळावे लागलीत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन ‘तोपर्यंत’ तोडणार नाही – अजित पवार यांची घोषणा

टीआरपी घोटाळा प्रकरण : पार्थो दासगुप्ता यांना जामीन मंजूर