यंदा मुंबईकरांना नेहमीप्रमाणे होळी साजरी करता येणार नाही आहे. अर्थात होळी घरातल्या घरात खेळता येईल पण चाळ किंवा इमारतीच्या आवारात सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांची मुंबईवर करडी नजर असणार असून कोणत्याही प्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन होवू नये आणि काटकोरपणे पालन व्हावे यासाठी हे पथक सज्ज असणार आहे.
होळी खेळ साधेपणाने साजरा करण्यास महानगरपालिकाच्या वतीने सागण्यांत आले आहे. पालिकेने तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार केली आहेत. ही पथके नियमांचे उल्लघंन होत असेल तर दंडात्मक कारवाई करणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.
साधेपणाने होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात. “परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत ही होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीचे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करूया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केलय.
काय आहेत नियम?
पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर ही पाच नियमांचे उल्लघंन होत असेल तर दंडात्मक कारवाई करणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.
Comments
Loading…