in

तुरुंगात जायचे नसेल, तर लग्न करावे लागेल; सुप्रीम कोर्ट

लोकशाही न्यूज नेटवर्क

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला आहे. पंजाबमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने एक हा निर्णय दिला आहे की, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणांना तुरुंगात जायचे नसेल, तर लग्न करावे लागेल असा सुप्रीम कोर्टाने इशारा दिला आहे.


सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती एएस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी झाली. पंजाबमधील एक उच्चवर्णीय मुलाने अनुसूचित जातीतील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत तिचे शोषण केल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. २२ डिसेंबर २०२० रोजी दोन्ही कुटुंबात एक करार होऊन या दोघांच्या लग्नावर सहमती झाली होती. मात्र, मुलगी सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ती भारतात आल्यावर दोघांचे लग्न लावून देण्यात येईल, असे वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने या तरुणाच्या अटकेला स्थगिती देत, जर मुलाने लग्न केले नाही, तर त्याने तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, अशा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, २०१६ मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ही तरुणी ऑस्ट्रेलियात गेली होती आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मुलाने विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, अनुसूचित जातीतील असल्यामुळे मुलीने प्रस्ताव फेटाळला. तरीही तरुणाने विवाहात कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन दिले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यावर जोर देऊ लागला. तरुणी तयार नसल्याचे पाहून तिला गुंगीचे औषध देऊन तरुणाने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले दोघे जण भारतात आले. प्रकरण पुढे वाढत गेल्यानंतर तरुणाविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यंदाचा माघी गणेशोत्सव कोरोनाची खबरदारी पाळूनच!

अविनाश भोसले यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात