in ,

कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला? सभागृहात फडणवीस आक्रमक

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. आमचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर आम्ही एक मिनिट बसणार नाही, कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विरोधकांनी गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे.

यंदा दहा दिवस अधिवेशन होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महागाईचा भडका ; LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या

Maharashtra Assembly Budget | बोलू देत नसल्याने विरोधकांचा सभात्याग