in

दीपाली चव्हाण आत्महत्या : आमदार रवी राणा यांच्या पत्राकडे तत्कालीन वनमंत्र्यांनी केले दुर्लक्ष

मेळघाटातील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक नवी बाब समोर आली आहे. दीपाली चव्हाण यांना वरिष्ठांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची कल्पना आमदार रवी राणा यांनी तत्कालीन वनमंत्र्यांना दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.


मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीही लिहिली होती. या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. हा अधिकारी दीपाली यांना मानसिक त्रास देत होता, असे पत्र आमदार रवी राणा यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना सहा महिन्यांपूर्वीच दिले होते. तसेच या कारणास्तव या दोघांपैकी एकाची बदली करण्याची विनंतही त्यांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

What do you think?

-6 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये केमिकलच्या टाकीत गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

देवेंद्र फडणवीस म्हणतात, लॉकडाऊन नाही, तर ‘हा’च कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय!