in ,

गृहमंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेणार

पुष्पक एक्स्प्रेसमधील दरोडा तसेच महिला बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर ठोस उपाय करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सीसीटीव्ही बसवावेत तसेच रेल्वेतील सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयात ही बैठक होणार आहे. दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन केलं गेलंय. या बैठकीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती कळतीय. तसंच इतरही बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इम्तियाज खत्री पुन्हा एनसीबी कार्यालयात !

अंबरनाथमध्ये एमआयडीसीत गॅस गळती; १२ जणांना रुग्णालयात केलं दाखल