in

फास्टॅग सक्तीबाबत महत्वाची बातमी, फास्टॅगसक्ती महिन्याभरानंतर

लोकशाही न्यूज नेटवर्क

फास्टॅगसक्तीबाबत महत्वाची बातमी. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगला पुन्हा मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे तुमच्या वाहनावर फास्टॅग स्टिकर नसेल तर त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. देशातील सर्वच महामार्गांवर वाहनचालकांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वेशींवर फास्टॅगसक्ती महिन्याभरानंतर करण्यात येणार आहे.  इतरत्र आजपासून अंमलबजावणी होणार आहे. जर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर प्रवास करताना ‘फास्टॅग’ नसल्यास आज, मंगळवारपासून वाहनचालकांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. मुंबईच्या वेशींवर मात्र ‘फास्टॅग’सक्ती लांबणीवर पडली असून, तिथे महिनाभरात फास्टॅगची १०० टक्के अंमलबजावणी होऊ शकेल.

टोल नाक्यांवरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ‘वन नेशन, वन फास्टॅग’ धोरण लागू केले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील टोलनाक्यांवर मार्शलची नियुक्ती के ली जाणार आहे. कठोर अंमलबजावणीमुळे टोलनाक्यावर गोंधळ होण्याची शक्यता गृहीत धरून कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीसही नेमण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्य शासनाकडे केली आहे.

वाहनावर टॅग नसल्यास मार्शल चालकास टोल नाक्यावरील टॅग विक्रीच्या ठिकाणी घेऊन जातील आणि टॅग बसवण्यास सांगतील. मंगळवारपासून अंमलबजावणी होणार असल्याने टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे. परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचीही मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले.

कोंडीची शक्यता

टोल नाक्यांवरील मार्गिकांवर फास्टॅगची अंमलबजावणी केली जाणार आहे. टॅग नसल्यास दुप्पट टोल चालकांना भरावा लागेल. टॅग टोल नाक्यांवरील मार्गिकांवरही उपलब्ध केले असून ते घेण्यासाठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे वाहनांच्या रांगाही लागण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व्यक्त करतात.

मुंबईत २२ नाक्यांवर फास्टॅग

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत नागपूर विभागाच्या अखत्यारीत साधारण २५ टोल नाके , तर मुंबई विभागातील २२ टोल नाक्यांवर फास्टॅगची अंमलबजावणी होईल. देशात टॅगच्या वापराचे प्रमाण साधारण ८० टक्के असून महाराष्ट्रात ते ७० ते ७५ टक्के आहे.

अटी कोणत्या?

– फास्टॅग मिळवण्यासाठी वाहन मालकाची केवायसी कागदपत्रे, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि मालकाचे छायाचित्र आवश्यक.

– एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येईल. तो बचत खात्याला लिंक करता येईल. डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा आहे.

– फास्टॅग नोंदणी पाच वर्षांपर्यंतच वैध असेल. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल, नोंदणी करावी लागेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai – Pune | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात

आरेमधील वृक्षतोडीला विरोध आणि दानापाणीत वृक्षतोड; शिवसेनेचं बेगडी पर्यावरणप्रेम उघड