in

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत महत्वाची बातमी!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द झाली. त्यानंतर मात्र दहावीचा निकाल कशापद्धतीने जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून होतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली. त्यानुसार या निकालाबाबतचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कार्यपद्धती जाहीर केली आहे.

दहावीचा निकाल कशापद्धतीने जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून होतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली. त्यानुसार या निकालाबाबतचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कार्यपद्धती जाहीर केली आहे.

दहावीचा निकाला संदर्भातील कार्यपद्धतीमध्ये नववीचा अंतिम निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यात 100 गुणांचे 50 गुण तयार करण्यात येणार आहेत. तर दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्याक्षिक/ अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता नववीतील 100 पैकी 50 गुण तर दहावीतील 80 पैकी 30 गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन

Mumbai Rain Updates | मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी