in ,

Corona Virus : महामारीच्या काळातील निधी वाटपात पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप

कोरोना सारख्या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (2 मार्च) विधानसभेत केला. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांना देण्यात आलेल्या निधीमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर भेदभाव झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जम्बो रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. पण यात विक्रमी भ्रष्टाचार देखील झाला असल्याची टीका फडणवीस यांनी केली. या महामारीच्या काळात राज्य शासनाच्या कारभारातील हलगर्जीपणा पाहायला मिळाला. या महामारीच्या काळात महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर जवळपास साडेनऊ लाख रुग्णांची संख्या कमी झाली असती. शिवाय 31 हजार करोना रुग्णांचे प्राण वाचवता आले असते, असे फडणवीस म्हणाले.

तर दुसरीकडे, या काळात राज्यातील सहा विभागांना एकूण 907 कोटी 90 लाखांचा निधी निधी देण्यात आला. मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीतील आकडेवारी लोकशाहीकडे उपलब्ध झाली आहे. या निधी वाटपात पश्चिम महाराष्ट्रावर राज्य सरकारची मेहेरनजर असल्याचे यात स्पष्ट होते. पश्चिम महाराष्ट्राला तब्बल 254 कोटी 46 लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर, विदर्भाला सर्वात कमी म्हणजे अवघे 132 कोटी रुपये मिळाले आहेत. तर,

मराठवाड्याच्या वाट्याला केवळ 194 कोटी 10 लाख, सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईला फक्त 114 कोटी मिळाले आहेत. यावरून विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विकासकांकडील बेस्टची थकबाकी वसूल करण्यासाठी लवादामार्फत प्रयत्न – मंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी आक्रमक; ‘त्या’ राज्यात भाजपविरोधी मतदान करण्याचे आवाहन करणार