in ,

कल्याणमध्ये २ तरुण, एका तरुणीला जमावाकडून मारहाण

कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. रिक्षातून प्रवास करत असताना तो रिक्षाचालक तिची छेड काढू लागला. यानंतर त्या तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने संबंधित ठिकाणी येण्यास सांगितले. यानंतर तिचे दोन्ही मित्र पोहोचल्यानंतर त्यांचा रिक्षाचालकांशी वाद झाला. मात्र यावेळी इतर जमावाला त्या दोघांसह तरुणीला गावातील काही लोकांनी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Google Doodles | लुडविग गुटमन यांना अनोखी आदरांजली

आमिर खान-किरण रावचा घटस्फोट