in , , ,

देशात 22 हजार कोरोनाबाधित, तर 25 हजारांची कोरोनावर मात

काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत चढ- उतार होताना दिसत आहे. दसरा, दिवाळी जवळ येत असताना देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय झाला आहे. देशात आज 22,842 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 244 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 25,930 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून शुक्रवारी कोरोनाचे 69 लाख 33 हजार 838 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण 89 कोटी 74 लाख 81 हजार 554 इतके डोस देण्यात आले आहेत. दरम्यान भारतातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या केरळमध्ये शुक्रवारी 13 हजार 834 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 95 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांनंतर केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे आढळून आले.

गेल्या 24 तासात भारतात 22 हजार 842 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात देशात 25 हजार 930 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. लसीकरणाचा 16 जानेवारीपासून पहिला टप्पा – आरोग्यसेवक, 1 मार्चपासून दुसरा टप्पा – 60 वर्षे वयावरील नागरिक, एकापेक्षा अधिक व्याधी असलेल्या 45 वर्षे वयावरील नागरिक,1 एप्रिलपासून तिसरा टप्पा – 45 वर्षे वयावरील सर्वांना, 1 मेपासून चौथा टप्पा – 18 वर्षे वयावरील सर्वांना अशा प्रकारे विभाजन झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑनलाईन नोकरी शोधत असाल तर सावधान!

उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; सर्वत्र स्वच्छतेची लगबग