in

भाईंदरमध्ये घरातील सिलिंगचा भाग कोसळल्याची घटना; एकाचा दुर्दैवी मृत्यू

महेंद्र वानखडे | भाईंदर पश्चिमेच्या एका इमारतीतील घराचे सिलिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा दुदैवी अंत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेने शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

रोज विल्ला इमारती मधल्या पहिल्या मजल्यावरील घराचे सिलिंग अचानक कोसळले आहे. या दुर्घटनेत कॅमी ब्रिटो (39) नामक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच घटनास्थळी मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

दरम्यान शहरात इमारतीचा भाग कोसाळ्याची महिन्याभरातली ही तिसरी घटना आहे. या सततच्या घटनेमुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कौतुकास्पद! महिला सरपंचानं मंगळसूत्र गहान ठेऊन भागवली गावाची तहान

धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं; २४ तासांत एकाही कोरोना रुग्णाची नोंद नाही