in

तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि विकास बहलच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे छापे

तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि विकास बहलच्या घरावर आणि मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाने केलेली कार्यवाही ‘फँटम’ फिल्म्ससंबधित आहे.

मुंबईमधील अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागानं कार्यवाही सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या कलाकारांच्या नावावर मोठ्या प्रमणात प्राप्तिकर चोरी केल्या प्रकरणी कार्यवाही केली जात आहे. या कार्यवाहीत अनेक बड्या कलाकारांची नवे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फँटम फिल्म्स विषयी :
फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनी आहे. तिची स्थापना २०१० मध्ये झाली. अनुराग कश्यप, विकास बेहेल, मधू मंटेना यांनी फँटमची उभारणी केली. चित्रपट निर्मिती आणि वितरणाचं काम फँटम कंपनी करते. अनुराग कश्यप या कंपनीचा मालक आहे. मार्च २०१५ मध्ये कंपनीतील ५० टक्के हिस्सा रिलायन्स इंटरटेनमेंटनं खरेदी केला. २०१८ मध्ये विकास बेहेल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानं त्याची फँटममधून हकालपट्टी करण्यात आली. सध्या मुंबई आणि पुण्यात २२ ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचं कार्यवाही सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra budget session | सरकार काळजीवाहू आहे, शेतकरी मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

वाढता वाढे दाढी अन् घसरता घसरे जीडीपी, शशी थरूर यांचे सूचक ट्विट