in

SidnNaaz ची अधूरी कहाणी !

बिग बॉस 13 चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूने टेलिव्हिजनसह सिनेसृष्टीला देखील धक्का बसला. सिद्धार्थ आपल्याला सोडून गेला आहे यावर आजही विश्वास बसत नाही. तो जरी आपल्यात नसला तरी त्याला शेवटचं पडद्यावर पाहता येणार असून सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलचे ‘अधूरा’ या एक म्युझिक व्हिडिओचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झालं आहे.

सिडनाझचा हा शेवटचा व्हिडीओ 21 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हे पोस्टर पाहून सिडनाझचे चाहते भावूक झाले आहेत. ते सोशल मीडियावर हे पोस्टर प्रचंड शेअर करत आहेत.

या गाण्याला प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनं आवाज दिला आहे. श्रेया घोषालनं पोस्टर शेअर करत म्हटलं आहे की, तो एक स्टार होता आणि नेहमीच राहील. लाखो लोकांच्या हृदयात असणारा तो नेहमीच चमकत राहील तसेच श्रेया घोषालनं पुढं म्हटलं आहे की, अपूर्ण पण तरीही पूर्ण. सिडनाझचे हे शेवटचे गाणं आहे.

प्रत्येक चाहत्याच स्वप्न.. कायमस्वरूपी आमच्या हृदयात जिवंत राहणार आहे. अधूरा फर्स्ट लुक पोस्टरच्या टॅग लाईन मध्ये म्हटले आहे की, एक अपूर्ण गाणं..एक अपूर्ण कहानी.. एक सिडनाझचं गाणं..

‘अधूरा ‘ गाण्याच्या लुक पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाजचे क्यूट बॉन्डिंग दिसत आहे. तो शहनाजचे नाक ओढताना दिसत आहे. या गाण्यात चाहत्यांना सिडनाझची जोडी शेवटच्या वेळी एकत्र पाहायला मिळेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Stock Market | सेन्सेक्स ६१,८१७ तर निफ्टी १८,५०० च्यावर झाला बंद

‘द बॅटमॅन’ चा ट्रेलर रिलीज