in ,

सुटका नाहीच ! आर्यन खानच्या कोठडीत वाढ

ड्रग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर ला NCB ने अटक केली होती. यानंतर त्याची रवानगी हि आर्थर रोड तुरूंगात करण्यात आली होती. मात्र आज मुंबई उच्च न्यायालयानं आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळं त्याला आणखी काही दिवस कोठडीतच राहावं लागणार आहे.

गेल्या १७ दिवसांपासून कोठडीत असलेल्या आर्यनची शाहरुख खाननं आज ऑर्थर रोड कारागृहात जाऊन भेट घेतली. १५ ते २० मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. आर्यनच्या भेटीनंतर शाहरुखची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मीडियानं त्याला गराडा घातला. पण त्यानं मौन बाळगणं पसंत केलं.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!

“नवाब मलिक खोटारडे, मी कधी दुबईला गेलोच नाही”