in

Gold Silver Price | सोने-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय बाजारात सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याचा दर हा 120 रुपयांनी वधारला आहे, चांदीची किंमत 425 रुपयांनी वाढली आहे.

जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक बदलानंतर सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 0.25 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच जुलै महिन्यात चांदीची किंमत ही प्रति किलोमागे 0.59 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे देशभरात या महिन्यात सोन्याची किंमत ही प्रति दहा ग्रॅम 2,000 रुपयांनी वाढली आहे.

सोमवारी सोन्याचा दर हा 120 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळे याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,662 रुपये इतकी झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजात सोन्याची किंमत प्रति औंस 1,900 डॉलर इतकी आहे. या महिन्यात सोन्याची किंमत तुलनेत जवळपास 8 टक्के वाढली आहे.MCX वर चांदीची किंमत 425 रुपयांनी वाढून 72,036 प्रतिकिलो झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा