वाढत्या महागाईच्या काळात भारतातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या काळातही अनेक कंपन्यांमध्ये वेतनवाढीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन वर्षात कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना ७.३ टक्के वेतनवाढ दिली जाईल, असे एका सर्वेक्षणामधून दिसून आले आहे.
डेलाईट टोश टोहमात्सू इंडिया एलएलपी (डीटीटीआयएलएलपी) कंपनीने २०२१ मधील मनुष्यबळ आणि वेतनवाढीच्या ट्रेण्डबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये ४०० कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
या सर्वेक्षणातील ९२ टक्के कंपन्यांनी वेतनवाढ दिली जाणार असल्याचे सांगितले. चालू वर्षात कंपन्यांकडून देण्यात येणारी सरासरी वेतनवाढ ही २०२० च्या तुलनेत ४.४ टक्क्यांनी अधिक असणार आहे. मात्र, २०१९ च्या तुलनेत ८.६ टक्क्यांनी कमी वेतनवाढ असणार आहे. परंतु गतवर्षी सर्वेक्षणातील केवळ ६० टक्के कंपन्यांनी वेतनवाढ दिली जाणार असल्याचे म्हटले होते. अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याने कंपन्यांनी वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉर्पोरेटमधील नफ्याचे प्रमाण सुधारत असल्याचे सुरुवातीला चिन्हे दिसत आहेत. सर्वेक्षणातील २० टक्के कंपन्यांनी दोन अंकी टक्क्यांमध्ये वेतनवाढ देणार असल्याचे म्हटले आहे.गतवर्षी १२ टक्के कंपन्यांनी दोन अंकी टक्क्यांमध्ये वेतनवाढ करणार असल्याचे म्हटले होते. या सर्वेक्षणामध्ये लाईफ सायन्सेस आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वाधित वेतनवाढ होणारा आहे.
Comments
Loading…