in

Ind Vs Eng 3rd ODI : इंग्लंडला चौथा धक्का… कर्णधार बटलर तंबूत परत

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर पार पडत आहे. इंग्लंडचा कर्णधार बटलर याने पुन्हा नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली. भारताच्या ३२९ धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडची सुरुवात जेमतेम झाली. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला 14 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर मागील सामन्यात शतकी खेळी केलेल्या जॉनी बेअरस्टोला वैयक्तिक एका धावेवर पायचित पकडले. त्यानंतर इंग्लंडला डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्सकडून चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र, नटराजनच्या गोलंदाजीवर स्टोक्स झेलबाद झाला. त्याने 35 धावा केल्या. स्टोक्सनंतर आलेला बटलरही काही खास कामगिरी करू शकला नाही. शार्दुल ठाकूरने त्याला 15 धावांवर पायचित पकडले.

या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला 330 धावांचं आव्हान दिलं आहे. ऋषभ पंत, शिखर धवन, हार्दिक पांड्याच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियानं सर्वबाद 329 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मागच्या सामन्यातील फॉर्म कायम राखत टीम इंडियाला शतकी सलामी दिली. रोहित 37 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या कर्णधार कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. तो 7 धावांवर बाद झाला.

हार्दिक आणि पंत या दोघांनी 99 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर हार्दिकनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर हार्दिक बाद झाला. हार्दिकने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने 3 षटकार आणि एका चौकारासह झटपट 30 धावांची खेळी केली. शार्दुलनंतर कृणालही 25 धावांचे योगदान देऊन बाद झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात अवैध वाळू उपसा बोटींवर कारवाई , 60 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट

filmfare | पाहा यावर्षी कोणा कोणाला मिळाली ‘ब्लॅक लेडी’