in

Ind vs Eng 3rd Test: पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 99 धावा

अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व गाजवलं आहे. गोलंदाजीत भारताने कमाल करत फलंदाजीत ही चमक दाखवली आहे.दिवसअखेर भारताने 3 गडी गमावून 99 धावा ठोकल्या आहेत. सध्या भारत 13 धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी भारत धावांचा डोंगर उभारतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फिरकीपटू अक्षर पटेलच्या समोर इंग्लंडच्या कुठ्ल्याच खेळाडूचा निभाव लागला नाही. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 112 धावांवर आटोपला.सलामीवीर जॅक क्रॉलीचे अर्धशतक वगळता इतर कोणताही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. पाठोपाठ बेन स्टोक्स (6) आणि ओली पोपही (1) स्वस्तात बाद झाले. जो रूट 17, फोक्स 12, जोफ्रा आर्चर 11, लीच 3, ब्रॉड 3 धावा केल्या आहेत. आपला १००वा सामना खेळणारा इशांत शर्मा याने इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिबली याला शून्यावर माघारी धाडलं. जॉनी बेअरस्टोदेखील शून्यावर बाद झाला. तो अक्षर पटेलचा बळी ठरला. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडचा सामन्यातील पहिला गडी घेतला, तर अनुभवी रविचंद्रन अश्विनने अक्षरला उत्तम साथ देत तीन बळी टिपले.

भारतीय सलामीवीरांनी अत्यंत संथ सुरूवात केली. पण अखेर 51 चेंडूत 11 धावा केल्यावर शुबमन गिल बाद झाला. पाठोपाठ चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पण विराटच्या साथीने डाव सावरत रोहित शर्माने 61 चेंडूत 57 धावा केल्या. दरम्यान भारताची धावसंख्या 3 बाद 99 झाली आहे. भारत 13 धावांनी पिछाडीवर आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…म्हणून सरकारी मालमत्तांची विक्री आणि खासगीकरण गरजेचे – पंतप्रधान

चोरीची अजबच घटना; स्मशानभूमीतून राखचं चोरली