in

Ind vs Eng 3rd Test: भारतीय गोलंदाजांची कमाल, इंग्लंडचा संघ 112 धावात तंबूत

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामना भारतीय गोलंदाजांनी गाजवला आहे. पहिल्याच दिवशीच्या खेळात इंग्लंडला 112 धावात ऑल आउट केले आहे. भारताकडून सर्वाधिक 6 विकेट अक्षर पटेलने घेतले आहेत.

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय सुरूवातीच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरूवात करत एका मागोमाग एक विकेट घेतले. इंग्लंडच्या जॅक क्रॉलीलाच अर्धशतकी खेळी अशी मोठी खेळी करता आली. बाकी खेळाडू मोठी धावसंख्या करू शकले नाही.

इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर सलामीवीर जॅक क्रॉलीने डाव सावरला. त्याने शानदार अर्धशतक केलं. पण कर्णधार जो रूट १७ धावांवर अश्विनची शिकार झाला. त्यानंतर जॅक क्रॉली अर्धशतक (53) ठोकून माघारी परतला. पाठोपाठ बेन स्टोक्स (6) आणि ओली पोपही (1) स्वस्तात बाद झाले. जो रूट 17, फोक्स 12, जोफ्रा आर्चर 11, लीच 3, ब्रॉड 3 धावा केल्या आहेत. आपला १००वा सामना खेळणारा इशांत शर्मा याने इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिबली याला शून्यावर माघारी धाडलं. जॉनी बेअरस्टोदेखील शून्यावर बाद झाला. तो अक्षर पटेलचा बळी ठरला.

दरम्यान भारतीय गोलंदाजांकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या तर अश्विनने 3 विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्मा ने एक विकेट घेतली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणतात, राज्यातील सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार

इतर वस्तू विकणारे रडारवर, ‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे होणार सर्वेक्षण