अहमदाबाद येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 145 धावापर्यंत कोसळला आहे. त्यामुळे भारताने 33 धावांची आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या डावात पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला दोन धक्के बसले आहेत. सध्या 32 धावांवर भारताचे तीन गडी बाद झाले आहेत. त्यामुळे इंग्लंड पुन्हा पहिल्या डावासारखा कोसळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडियाने पहिल्या डावात 145 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने 33 धावांची आघाडी घेतली आहे. तर इंग्लंडला दुसऱ्या डावात खराब सुरुवात सुरु आहे.अक्षर पटेलने पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला 2 धक्के दिले आहेत. अक्षरने जॅक क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद केलं. त्यामुळे पुन्हा इंग्लंड बॅकफुटवर गेली आहे.
नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड संघाने पहिला डावात 112 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून अक्षर पटेलने उत्कृष्ट गोलंदाजी करून 38 धावत 6 विकेट घेतल्या होत्या. तर अश्विनने 26 धावात 3 विकेट घेतल्या. दरम्यान पहिल्या दिवशी भारताची फलंदाजी चांगल्या लईत होती. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. आणि भारताचा पहिला डाव 145 धावापर्यंत आटोपला.
Comments
Loading…