in

Ind Vs Eng; टी-20 साठी ‘या’ तीन युवा खेळाडूंची भारतीय संघात निवड

मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तसेच राहुल तेवतिया यांची इंग्लंडविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे फळ सूर्यकुमारला मिळाले आहे. त्यामुळे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे सूर्यकुमारचे स्वप्न अखेर साकार होणार आहे.मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणारा किशन हा ऋषभ पंतनंतर भारतीय संघातील दुसरा यष्टीरक्षक असेल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकलेला उपकर्णधार रोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यान १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे.

‘या’ खेळाडूंना डच्चू

डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आणि मनीष पांडे यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे.

संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, इशान किशन, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.

टी-२० सामनयांचे वेळापत्रक

१२ मार्च – पहिला टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता
१४ मार्च – दुसरा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता
१६ मार्च – तिसरा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता
१८ मार्च – चौथा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता
२० मार्च – पाचवा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आर्चीला बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी, 6 जणांवर गुन्हा दाखल

जात पंचायतीतील संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी – प्रवीण दरेकर