in

IND vs NZ, 2nd Test, Day 2 : भारताची बिनबाद 69 धावांपर्यंत मजल

भारतीय सलामीवीरांनी बिनबाद 69 धावांपर्यंत मजल मारली आहे. मयंक अग्रवाल 38 आणि चेतेश्वर पुजारा 29 धावांवर खेळत आहेत. भारताने 332 धावांची आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडला पहिल्या डावात 62 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर किवी संघाला फॉलो ऑन न देता भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचे सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा मैदानात दाखल झाले होते. भारताची बिनबाद 69 धावांपर्यंत मजल मारली आहे. अग्रवाल 38 आणि चेतेश्वर पुजारा 29 धावांवर खेळत आहेत.

दुसऱ्य़ा दिवशीही एजाजने दमदार सुरुवात करत प्रथम वृद्धिमान साहा (२७) त्यानंतर रवीचंद्रन अश्विनला (०) माघारी धाडले. सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर मयंकसोबत अक्षर पटेलने अर्धशतकी भागीदारी रचली. लंचनंतर एजाजने भारताला अजून दोन धक्के दिले. त्याने दीशतक ठोकलेल्या मयंकला आणि त्यानंतर अक्षरला बाद करत आपला आठवा बळी नोंदवला. मयंकने १७ चौकार आणि ४ षटकारांसह १५० तर अक्षरने ५ चौकार आणि एका षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्यानंतर एजाजने जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांचा अडथळा यांचा अडथला दूर करत विक्रमी १० विकेट्स घेतले. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपला. एजाज पटेलने ४७.५ षटकात ११९ धावांत १० बळी घेतले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटीचा दुसरा दिवस असून भारताने आज ४ बाद २२१ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आज पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी करत उरलेल्या सहा गड्यांनाही बाद करत मोठा विक्रम नोंदवला. एजाजने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. यासह एजाजने भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेची बरोबरी केली. कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० बळी घेण्याची किमया केली होती.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षिकेने घेतले विष; आत्महत्येचा प्रयत्न

वाह रे पठ्ठ्या; आधी देवाला नमस्कार अन् मग दुकानात चोरी