in

IND vs SA 3rd Test Day 3 | दक्षिण आफ्रिकेला १११ धावांची गरज, भारत विजयापासून 8 विकेट दूर

केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली तिसरी कसोटी सामना निर्णायक स्थितीत पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेला १११ धावांची गरज आहे, तर भारत विजयापासून 8 विकेट दूर आहे. उद्या याचा निकाल समोर येणार असून कोण बाजी मारत याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

तिसऱ्या दिवसअखेर २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २ बाद १०१ धावा केल्या. आफ्रिकेने सुरुवातीला एडन मार्कराम आणि दिवसअखेर कप्तान डीन एल्गरला गमावले. चौथ्या दिवशी आफ्रिकेला विजयासाठी १११ धावांची आवश्यकता आहे. भारताचा दुसरा डाव आज १९८ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून ऋषभ पंतने झुंजार आणि नाबाद शतकी खेळी केली. मधल्या फळीत त्याने विराटसोबत ९२ धावांची मौल्यवान भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने ४ बळी टिपत भारताला अपेक्षेनुसार जास्त धावा करू दिल्या नाहीत.

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १११ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे आव्हान दक्षिण आफ्रिका पुर्ण करते का ? की भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला रोखण्यात अपयशी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dattatray Ware | निलंबित शिक्षक दत्तात्रय वारेंना न्यायालयाचा दणका!; याचिका फेटाळली

दिलासा! राज्यात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला नाही