in

IND vs SA : ‘विराट’ विजयाची आशा, दुसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद ५७ धावा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावाला सुरूवात झाली आहे. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. मात्र विराट आणि पुजाराने डाव सावरलाय. दरम्यान कोहलीने पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण त्याचे शतक मात्र हुकले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात कोहली शतकाची कसर भरून काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कोहली १४ तर पुजारा यावेळी ९ धावांवर नाबाद आहेत.

भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण पुन्हा एकदा विराटने संघाला तारले. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारताची २ बाद ५७ अशी स्थिती आहे आणि त्यांच्याकडे एकूण ७० धावांची आघाडी आहे. कोहलीने पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण त्याचे शतक मात्र हुकले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात कोहली शतकाची कसर भरून काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या वेगवान आणि तिखट माऱ्यासमोर विराट वगळता भारताचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. विराटने ७९ धावा करत संघाला आधार दिला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २०९ धावांवर आटोपला आहे. कीगन पीरसनने झुंजार फलंदाजी करत ७२ धावांची खेळी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्धा जिल्हा न्यायालयात कालीचरण बाबाला हजर केल्यानंतर पुन्हा रायपूरला रवाना

संसदेत कोरोनाचा स्फोट; ७१८ कर्मचारी पॉझिटिव्ह