in

IND vs NZ 2nd T20 | भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेटसने विजय

भारताने न्यूझीलंडविरूद्धची दुसरी टी20 मालिकाही खिशात घातली आहे. भारताने हा सामना 7 विकेटसने जिंकला. त्यामुळे भारताने मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना झारखंडच्या JSCA International Stadium Complex मध्ये खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा डाव 6 बाद 153 धावांमध्ये रोखण्यात भारताला यश आलं. भारताकडून या डावात हर्षल पटेलने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर अक्सर पटेल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतला.

न्यूझीलंडने दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने 7 विकेट आणि 14 चेंडू राखून पूर्ण केलं आहे. के एल राहूल 65 आणि रोहीतने 55 धावा केल्या. 18 व्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असताना ऋषभ पंतने सुरुवातीच्या दोन चेंडूंवर सलग षटकार ठोकत सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर…’हे’ आहेत उमेदवार

अहंकाराचा पराभव झाला; ‘सामना’मधून केंद्रावर हल्लाबोल