लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत आणि चीन सीमेवरील वाद निवळताना दिसत आहे. दोन्ही देशांनी या सीमेवरील सैन्य माघारी घेण्यास दोन्ही देशांनी सुरुवात केली आहे. पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन सैन्य माघारी घेतले जात असून भारताच्या लष्कराने याचे फोटो आणि प्रसिद्ध करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी संसदेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेच्या नवव्या फेरीनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली होती.
या संदर्भात भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. त्यात “उठसूठ मोदी सरकारला चीनवरून प्रश्न विचारणाऱ्या आगाऊ नेत्यांसाठी ही जोरदार चपराक आहे.” असे म्हणतं विरोधकांना टोला लगावला आहे.
लडाख पूर्व भागात गेल्या वर्षी भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. यावेळी झालेल्या झटापटीत हिंदु्स्थानचे 20 शहीद झाले होते, तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले होते. तेव्हापासून या भागात तणाव वाढला होता. अखेर दोन्ही देशांच्यामध्ये झालेल्या नवव्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्याची ठरवले.
Comments
Loading…