in

भारताची विक्रमी कामगिरी ! भारताने ओलांडला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा

आज भारताने कोरोना विरोधात एक ऐतिहासीक कामगिरी बजावली आहे. जवळ जवळ दोन वर्ष संपुर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी भारताने आज १०० कोटी जनतेचे लसीकरण पुर्ण केले आहे.

आतापर्यंत, १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५,२९,४४,०२१, ४५ ते ५९ वयोगटातील २६,८७,६५,११० आणि ६० वर्षांवरील १६,९८,२४,३०८ लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया म्हणाले की, लसीचे १०० कोटी डोस दिल्यानंतर, मिशन अंतर्गत, आम्ही याची खात्री करू की ज्यांना पहिला डोस मिळाला आहे त्यांना दुसरा डोस मिळेल जेणेकरून त्यांचे कोविड -१० पासून संरक्षण सुनिश्चित होईल. केंद्र सरकारने म्हटले आहे की ज्या गावांना १००% लसीकरण करण्यात आले आहे त्यांनी १०० कोटी डोसची विक्रम साजरा करण्यासाठी या मोहिमेतील प्रमुख आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुणगान करणारे पोस्टर बॅनर लावावेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोठी बातमी : शाहरुखने आर्थर रोड तुरुगांत जाऊन घेतली आर्यनची भेट

Police Commemoration Day 2021 | भारतात पोलीस स्मृती दिवस का साजरा करतात?