in ,

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुजरातमधील सुरत इथे एका कार्यक्रमात आभासी कार्यक्रमाद्वारे उपस्थित राहत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यानिमित्ताने भारतीय अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं. ” स्टार्टअप इंडियाचे यश आपल्या सर्वांसमोर आहे.

आज भारतातील स्टार्टअप संपुर्ण जगात नाव कमवत आहेत. कोरोनाच्या कठीण काळानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने जेवढ्या वेगाने उभारी घेतली आहे की संपुर्ण जग आशेने भारताकडे बघत आहे. एका जागतिक संस्थेने पण असं म्हंटलं आहे की पुन्हा एकदा भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे “, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरातचे नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे जोरदार कौतुक मोदी यांनी केले. विविध तंत्रज्ञानाची माहिती सुरुवातीपासून असलेले भूपेंद्र हे आजही जमिनीवर आहेत. ते आजही कुठल्या वादात अडकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात आणखी विकास करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील ऊस वाहतूकदार संपावर

टीव्हीच्या स्फोटाने घराला आग